ए साथ हिंदू-मुसलमान का छूट जायेगा.. तो भारत टूट जायेगा; अबू आझमींचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Content Team
Published:

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे.

राज ठाकरे भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल बोलले आहेत. मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा त्यांनी दिला दिला होता.

यावर आता मुस्लिम बांधवांकडून प्रतिक्रिया येत असून अबू आझमी यांनीही यावर शायरीतून (Abu Azmi) फटकेबाजी केली आहे. हवेली, झोपडी सबका मुक्कदर फूट जायेगा, अगर ए साथ हिंदू-मुसलमान का छूट जायेगा, दुआ किजीए की हम में प्यार के रिश्ते रहें कायम, ये रिश्ते टूट जायेंगे तो भारत टूट जायेगा, अशी शायरी करत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशीवरील भोंग्यांबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच अबू आझमी म्हणाले, राज ठाकरेंच्या भाषणावर निशाणा साधताना, राज ठाकरे हे थकलेले, हरलेले नेते आहेत, ते परेशान आहेत. राजकारणात त्यांना जागा मिळत नाही. म्हणून आता ते मुस्लिमांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू पाहत आहेत, असे ते म्हणाले आहेत.

त्याचसोबत या पूर्वी ते परप्रांतीय आणि इतर अनेक मुद्द्यावर राजकारण करत आले आहेत. त्यांना जर नोईज पोल्युशन (ध्वनी प्रदूषण) बाबत एवढी चिंता आहे तर कधी त्यांनी बीयर बारमध्ये डीजे, लग्नात डीजे, फटाके, नेत्यांच्या स्वागत मध्ये फटकेबाजी, गणपती, नवरात्री इतर वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणवर आवाज उठवला आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी काल भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समाचार घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe