पोलिस फायर गाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलिस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली.

ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लोणी येथील पीव्हीपी चौकात घडली. सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे.

सकाळी दहा वाजेच्या सुमारास सौ.गौरी योगेश देशपांडे अंदाजे वय 35 ते 40 या त्यांची मुलगी तन्नया योगेश देशपांडे हिला आपल्या दुचाकीवरून पीव्हीपी चौकातुन दवाखान्यात घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

यावेळी उमरगाव, गुजरात कडून बेंगलोर, कर्नाटकच्या दिशेने जात असलेल्या पोलिस फायर च्या गाडीचा आणि सौ देशपांडे यांच्या गाडीचा अपघात झाला.

या अपघातात सौ गौरी देशपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांची मुलगी तन्नया देशपांडे ही जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सौ गौरी देशपांडे व तनया देशपांडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

मात्र सौ गौरी देशपांडे यांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले. सदर अपघातात मयत झालेल्या महिलेला पोलिस फायर गाडीने सुमारे 100 फूट फरपटत नेल्याचे प्रथम दर्शनी यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी चालक सोमनाथ रेकु चव्हाण व त्याचा साथीदार असं दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe