अहमदनगर ब्रेकिंग : सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला गजाआड

Published on -

Ahmednagar Breaking : प्रवाशी महिलांच्या बॅगेतील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला गजाआड करण्यात आली आहे. उर्मिला नवनाथ काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी उर्मिला काळे हिच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. नेवासा येथील गायत्री नामदेव जव्हादे (रा. वाकडी, ता.नेवासा ) बस स्टॅण्ड येथे थांबल्या होत्या. त्यांच्या बॅगेतील १६ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्‍कम चोरीस गेले होते.

ही घटना २३ जून २०२३ रोजी घडली होती. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासाअंती एलसीबीच्या पथकाने ‘तारकपूर बसस्थानकावर उर्मिला काळे हिल्ल ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, तिला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe