अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे ऑनलाईन जुगार लॉटरी लागली कि आपली स्वप्न पूर्ण होण्याचा हमखास उपाय पण अशा या लॉटरीचा विनापरवाना ऑनलाइन दुकान थाटून कोपरगावातील बंधूंनी जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीचा असा चक्रव्यूह निर्माण केला आहे
की जिल्ह्यात अनेक तरुण या चक्रव्यूहात गुंतले असून लॉटरीच्या नादापायी लाखो रुपये गमावून बसले व अनेकांचा संसार उध्वस्त झाला आहे अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन अशा विनापरवाना लॉटरी व्यावसायिकांवर कारवाई करत नाही
डोळेझाक करत आहे त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करतात व ऑनलाईन लॉटरी जुगार ऐक दिवस बंद पडला तर दुसऱ्या दिवशी मोठ्या जोमाने सुरू होत आहे त्यामूळे ऑनलाईन लॉटरी जुगार बंद होण्यासाठी
शहरातील महिला लवकरच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन कायमस्वरूपी हा जुगार बंद करण्याची मागणी करणार आहे.
कोपरगाव मधील दोन बंधूंचा ऑनलाइन चक्रविव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उध्वस्त करून या लॉटरी मुळे उद्ध्वस्त होत असलेल्या युवा पिढीला या चक्रव्यूहातून बाहेर काढावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील महिलावर्ग व्यक्त करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम