Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील बांधकाम सुरू असलेल्या भव्य राम मंदिरासाठी अलिगड येथील एका कारागिराने तब्बल ४०० किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे.
या ऐतिहासिक व भव्य मंदिराला शोभेल, असे कुलूप सत्यप्रकाश शर्मा नामक एका उत्साही रामभक्ताने तयार केले आहे. शर्मा यांनी बनवलेले कुलूप हे जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप असल्याचा दावा करण्यात येत आहे.

भव्यदिव्य कुलूप तयार करण्यासाठी शर्मा यांना अनेक महिने कष्ट करावे लागले. या वर्षाच्या शेवटी राम मंदिराच्या व्यवस्थापकांकडे हे कुलूप सुपूर्द करण्याची योजना कारागीर शर्मा यांनी आखली आहे.
मंदिराच्या उभारणीसाठी रामभक्तांकडून वेगवेगळी भेट मिळत असल्याचे श्रीराम जन्मभूमी विश्वस्त मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. शर्मा यांच्याकडून भेट म्हणून मिळणाऱ्या कुलपाचा उपयोग कशा प्रकारे करता येईल, हेदेखील पहावे लागणार असल्याचे पदाधिकाऱ्याने नमूद केले.
प्रकाश शर्मा यांचे पूर्वज एका शतकाहून अधिक काळापासून हस्तनिर्मित कुलपांची निर्मिती करतात. शर्मा स्वतः गत ४५ वर्षांपासून अलिगडच्या ‘ताला नगरीत’ कुलूप तयार करण्याचे व त्याला झळाळी देण्याचे काम करतात.
अयोध्येतील भव्य राम मंदिराचा विचार करून त्याला साजेसे ४ फूट लांबीच्या चावीने उघडणाऱ्या या कुलपाची उंची १० फूट तर रुंदी ४.५ फूट असून, त्याची जाडी ९.५ इंच असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
या वर्षाच्या सुरुवातीला अलिगड येथील वार्षिक संमेलनात हे कुलूप ठेवण्या आले होते. कारागीर शर्मा सध्य या कुलपात छोटे-मोठे बदल व सजावट करत आहेत. या कुलपाच निर्मिती करण्यासाठी सत्यप्रकाश शर्मा यांच्या सोबतच त्यांच्य पत्नीनेही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
कुलूप तयार करण्यासाठी लाख रुपये खर्च आल्याचे या वेळ शर्मा यांनी नमूद केले. पुढील वर्ष २१, २२ व २३ जानेवारी रोज राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.