अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- कोरोना विषाणूमुळे भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक बदलण्यात आलं होतं. पण आता यजमान संघातील एका फलंदाजाला कोरोना मिळाला आहे.
या बातमीनंतर भारत-श्रीलंका सीरिजमधील धोका आणखी वाढला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजवर कोरोनाचं संकट अधिक गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोच पाठोपाठ खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
भारता विरूद्ध श्रीलंका सीरिजमधील संकटं संपण्याचं नाव घेत नाहीत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्य आणि कोच पाठोपाठ आता एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. श्रीलंकेचे खेळाडू सराव न करता मैदानात उतरणार आहेत.
सर्व खेळाडूंना सध्या तरी क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. श्रीलंकेचा श्रीलंकाचे बॅटिंग कोच ग्रॅन्ट फ्लॉवर इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली. एका फलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं चिंता वाढली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम