चिंताजनक बातमी ! ह्या आमदारांसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण …

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबईमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती यावेळी दिली आहे.

मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 32 कोरोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विधानसभा अधिवेशनासाठी 22 डिसेंबरपासून समीर मेघे हे सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतरही आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. यातूनही इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सगळ्याच आमदारांची चिंता काहीशी वाढली आहे.दरम्यांन कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळ्याच आमदारांची चिंता वाढली आहे.

अधिवेशनासाठी सभागृहात प्रवेश करताना सर्व अधिकारी, कर्मचारी व आमदारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते आहे. तसेच सर्वांना मास्क देखील अनिवार्य करण्यात आलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe