काँग्रेसची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी, पक्षाचा चमत्कार करण्यास प्रियांका गांधी कमी पडल्या?

नवी दिल्ली : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल लागला आहे. यात काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोलले जात आहे.

तसेच पंजाबमध्ये (Panjab) आपने मोठे यश मिळवले आहे. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आले नाही. तसेच यूपी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचेही सांगितले जात आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) वढेरा या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, पण त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

निवडणुकीचा निकाल शेवटच्या टप्प्यात काँग्रेसमध्ये रामपूर खासमधून आराधना मिश्रा ‘मोना’ आणि महाराजगंजच्या फरेंडामधून वीरेंद्र चौधरी यांनाच विजय मिळवता आला आहे.

या निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांनी सुरुवातीच्या काळात युतीसाठी सहमती दर्शवली असावी, पण शेवटी एकट्यानेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, पण तरीही उपयोग झाला नाही.

यावेळी दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. याआधी, पक्षाने २०१७ च्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या,त्यात सात जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी काँग्रेस आणि सपा यांनी मागील यूपीची निवडणूक एकत्र लढवली होती, पण तरीही पक्षाला कोणताही चमत्कार दाखवता आला नाही.

1951 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बंपर विजय मिळाला होता. त्यानंतर पक्षाला 388 जागा मिळाल्या. यानंतर दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 286 जागा जिंकल्या.

नंतर पक्षाला 1980 मध्ये 309 आणि 1985 मध्ये 269 जागा मिळाल्या. 1991 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने 50 चा आकडा पार केला नाही. अशा स्थितीत यावेळचे निकाल पक्षासाठी सर्वात वाईट ठरले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe