Reliance Jio 5G Upgrade Plan : व्वा, ऑफर असावी तर अशी! फक्त 61 रुपयांमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

Published on -

Reliance Jio 5G Upgrade Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे लाखो ग्राहक आहेत. कल्पावधीतच रिलायन्स जिओ या कंपनीने ग्राहकांच्या आणि मार्केटमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.

कंपनी सतत ग्राहकांच्या खिशाला परवडेल असा रिचार्ज प्लॅन सादर करत असते. असाच कंपनीचा एक 61 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा वापरता येईल. काय आहे कंपनीचा हा प्लॅन? त्याचा ग्राहकांना कसा फायदा होतो? ते जाणून घेऊयात सविस्तरपणे..

जर तुमचा कोणता रिचार्ज प्लॅन 5G ला सपोर्ट करत नसेल, तर Jio द्वारे 5G अपग्रेड प्लॅन ऑफर केला जातो परंतु असे अनेक प्लॅन आहेत जे 5G ला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला 5G सेवा वापरायची असेल जी तुमच्या विद्यमान प्लॅनसह वापरली जाऊ शकते, तर त्यासाठी तुम्ही Jio चा 61 रुपयांचा 5G अपग्रेड प्लॅन निवडू शकता.

जाणून घ्या प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनची किंमत 61 रुपये आहे. हा 5G अपग्रेड प्लॅन 5G डेटाच्या सुविधेसह येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा डेटा व्हाउचर प्लॅन आहे, ज्यात इतर कोणत्याही फायद्यांचा समावेश नाही.

या प्लॅनसोबत घेता येईल फायदा

  • जिओचा 119 रुपयांचा प्लॅन
  • जिओचा 149 रुपयांचा प्लॅन
  • जिओचा 179 रुपयांचा प्लॅन
  • जिओचा 199 रुपयांचा प्लॅन
  • जिओचा 209 रुपयांचा प्लॅन

जर डेटा फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 6GB 5G डेटा देण्यात येतो. यात अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा मिळतो. जरी, हा प्लॅन समाप्त करण्यासाठी कोणतीही वैधता नसली तरी केवळ 6 GB डेटा उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News