Amazon Great Republic Day Sale : Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही स्वस्तात लॅपटॉप खरेदी करू शकता.
या दरम्यान तुम्ही Honor MagicBook 14 आणि Asus VivoBook 14 खूप कमी किमतीत विकत घेऊ शकता. त्यामुळे तुमची हजारोंची बचत होणार आहे.

1. Honor MagicBook 14
जर तुम्ही 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा तसेच पातळ आणि हलका लॅपटॉप शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक संधी आहे. कारण Honor MagicBook 14 सध्या Amazon वर 40,990 रुपयांना उपलब्ध आहे.
या लॅपटॉपची मूळ किंमत 75,999 रुपये इतकी आहे. तसेच यावर जास्त सूट मिळवण्यासाठी 10,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर लागू करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये AMD Ryzen 5 प्रोसेसर आहे. यात 16GB रॅम आणि 512GB SSD आहे. आउट-ऑफ-द-बॉक्स ते Windows 11 वर चालते.
2. Asus Vivobook 14
Asus VivoBook 14 स्वस्तात उपलब्ध आहे. या लॅपटॉपची किंमत 49,990 रुपये इतकी आहे. तसेच यावर 10,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही आहे.
हा 11व्या पिढीचा लॅपटॉप असून जो Intel Core i7 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. आउट-ऑफ-द-बॉक्स Windows 11 वर चालते. कंपनीने यामध्ये 16GB रॅम आणि 512GB SSD दिली आहे.
ही सेल 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे. तसेच फ्लिपकार्टवरही बिग सेव्हिंग डेज सेल 2023 सुरू आहे. हीदेखील सेल 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.