Xiaomi 13 Launch Date : 1 डिसेंबरला लाँच होणार Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro, असणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

Xiaomi 13 Launch Date : Xiaomi च्या स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. या कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

1 डिसेंबर रोजी Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने मागच्या वर्षीच Xiaomi 12x, Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro हे स्मार्टफोन लॉन्च केले होते.

Xiaomi 13 लाँच तारिख

कंपनीच्या मते, 1 डिसेंबर 2022 रोजी चीनमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार असून यामध्ये Xiaomi 13 सीरीज व्यतिरिक्त Xiaomi Buds 4 देखील उपलब्ध करून दिला जाईल.

Xiaomi च्या या सीरीजमध्ये दोन नवीन उपकरणांचा समावेश असणार आहे. तर फ्लॅट पॅनेलसह एक उपकरण आणले जाईल जे Xiaomi 13 असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, Xiaomi 13 Pro हा कर्व डिस्प्लेसह लाँच होईल अशीही शक्यता आहे.

कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे की, मानक Xiaomi 13 मध्ये फ्लॅट OLED पॅनेल आणि 1.61mm पातळ बेझल्स असतील. हे दोन्ही फोन मेटल फ्रेमसह लाँच होईल. Xiaomi Buds 4 देखील लाँच केला जाईल.

किंमत

जर किमतीबद्दल सांगायचे झाले तर अजून कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

Xiaomi 13 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंच 2K AMOLED डिस्प्ले असू शकतो.
  • कंपनी नवीनतम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देईल.
  • स्टोरेजचा विचार केला तर 12 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच हा फोन
  • वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेजमध्ये लॉन्च होऊ शकतो
  • कॅमेरा फ्रंटवर, Xiaomi 13 मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि 32-मेगापिक्सेल सेल्फी सेन्सरसह 50MP Sony IMX8-सिरीजचा मागील कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता आहे.
  • तर 4700mAh बॅटरी असू शकते जी USB Type-C द्वारे 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

कंपनीने गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये, Xiaomi 12x, Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro हे स्मार्टफोन लॉन्च केले होते. असे दिसते की Xiaomi 12X चा अपग्रेड मॉडेल यावर्षी लॉन्च केला जाणार नाही. येणाऱ्या Xiaomi 13 सिरीजमध्ये केवळ दोन प्रकार येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe