Xiaomi 13 Ultra : भारतीय बाजारातील दिग्ग्ज टेक कंपनी सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्यासाठी Xiaomi आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. कंपनी यात तगडा कॅमेरा आणि शानदार फीचर्स देत आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात Xiaomi 13 Ultra लाँच करणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फ्लॅगशिप फोन असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Xiaomi 13 Pro हा शानदार स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे.
Xiaomi 13 Ultra ला Leica कॅमेरा सेटअप मिळणार असून हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे त्यामुळे, कंपनीच्या मागील Xioami 12S Ultra ने कॅमेरा परफॉर्मन्सच्या बाबत सर्वांना प्रभावित केले आहे. सध्या हा फोन कंपनीने बाजारात लॉन्च केला नाही. हे स्पष्ट झाले आहे की Xiaomi 13 Ultra भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे. लाँच झाल्यानंतर हा स्मार्टफोन इतर ब्रँडच्या महागड्या फोनला टक्कर देणार आहे.
या महिन्यात लॉन्च होणार स्मार्टफोन
कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे की कंपनीचा आगामी फोन या महिन्यात लॉन्च केला जाईल. परंतु, कंपनीने या फोनच्या लॉन्चची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही. तसेच, देशात या महिन्यात लॉन्च करणार आहे की नाही, त्याच्याशी निगडित माहिती समोर आली नाही.
नुकताच या कंपनीकडून आपला Xiaomi 13 Pro स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे, या फोनने मजबूत कामगिरी शिवाय, कॅमेरा गुणवत्तेसाठी खूप प्रशंसा मिळवली असून या फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये तीन 50MP सेन्सर उपलब्ध असणार आहेत. नवीन फोनमध्ये चार 50MP कॅमेरा लेन्स मिळू शकतात.
कसा असणार कॅमेरा
टिपस्टर योगेश ब्रार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की नवीन फोनमध्ये मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP मानक सेन्सर शिवाय 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP झूम लेन्स दिली जाणार आहे.
कंपनीच्या अगोदरच्या Xiaomi 13 Pro फोन मध्ये सुद्धा असाच कॅमेरा सेटअप दिला गेला आहे मात्र हे लक्षात घ्या की झूम फोकस करण्यात आलेला कॅमेरा सेन्सर उपलब्ध नाही. झूम सेटअपशी निगडित माहिती समोर आली नाही. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
जाणून घ्या संभाव्य वैशिष्ट्ये
Qualcomm चा नवीनतम प्रोसेसर Snapdragon Gen 2 प्रोसेसर नवीन स्मार्टफोनमध्ये दिला जाऊ शकतो. लीक्सनुसार, कंपनीचा हा फोन 4900mAh क्षमता असणारी बॅटरी, 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असणार आहे. या फोनला LTPO तंत्रज्ञान समर्थनासह6.7-इंचाचा QHD + AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. 120Hz रिफ्रेश रेटसह मोठ्या डिस्प्लेसह येणारा हा फोन अनेक रॅम आणि स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे.