Xiaomi Pad 6 Pro : भारतीय टेक बाजारात सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. जशी स्मार्टफोनची मागणी वाढली आहे तशीच बाजारात टॅबलेटचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे टेक कंपन्या टॅबलेट देखील मार्केटमध्ये लाँच करत आहेत.
अशातच आता Xiaomi देखील आपला नवीन टॅबलेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीचा स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह नवीन टॅबलेट मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. तसेच यात कंपनी जबरदस्त फीचर्स देत आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन टॅबलेट खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

या अगोदर कंपनीचा हा टॅबलेट 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला असून सूची देखील पुष्टी करते की हा टॅबलेट अॅड्रेनो 730 GPU सह Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित असणार आहे. कंपनीच्या Xiaomi Pad 6 Pro मध्ये 11-इंचाचा AMOLED 2.8K डिस्प्ले असणार आहे ज्याचा रिफ्रेश दर 120Hz असू शकतो.
काय असणार फीचर्स?
कंपनीच्या आगामी Xiaomi Pad 6 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 11-इंचाचा LCD 2.8K डिस्प्ले देण्यात येणार आहे. प्रोसेसरचा विचार केला तर तो स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह येणार आहे. या टॅबलेटमध्ये 8,840mAh बॅटरी असणार आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi Pad 6 Series हा आगामी टॅबलेट USB 3.0 पोर्टसह 50 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा तसेच चार स्पीकरसह सुसज्ज असणार आहे. यात 12GB RAM सह Android 13 तसेच Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट Xiaomi Pad 6 Pro मध्ये उपलब्ध असणार आहे.
Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार
कंपनीचा आगामी फोन Xiaomi 13 Ultra 18 एप्रिल रोजी बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फ्लॅगशिप फोनसोबत कंपनी बँड 8 स्मार्ट बँड आणि पॅड 6 सीरीज टॅबलेट आणणार आहे. परंतु हा फोन लॉन्च होण्याआधी, Xiaomi Pad 6 Pro सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे, ज्या ठिकाणी या टॅबलेटची फीचर्स समोर आली आहेत.