Xiaomi Sale : लवकरच Xiaomi चा इंडिपेंडन्स डे (Independence Day) आणि राखी सेल (Rakhi Sale) सुरु होणार आहे. या सेलमध्ये Xiaomi च्या स्मार्टफोनवर तब्बल 15 हजार रुपयांपयंत सवलत देण्यात येणार आहे.
त्यामुळे Xiaomi चा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे. ही ऑफर केवळ 6 ते 11 ऑगस्ट या कालावधी दरम्यान सुरु राहणार आहे
Xiaomi 12 Pro वर प्रचंड सवलत
सेलमध्ये तुम्ही Xiaomi 12 Pro 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता, हा फोन 67,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. फोनवर सेलमध्ये 13 हजार रुपयांची अतिरिक्त सूट आणि SBI क्रेडिट कार्डवर (SBI Credit Card) 2 हजार रुपयांची झटपट सूट देखील आहे.
फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 1,500 निट्सच्या ब्राइटनेससह 6.73-इंचाचा WQHD + E5 AMOLED डिस्प्ले आहे. या फोनला लो टेम्परेचर पॉलीक्रिस्टलाइन ऑक्साइड (LTPO) बॅकप्लेन तंत्रज्ञान देण्यात आले आहे जे Apple च्या प्रीमियम iPhone मध्ये वापरले जाते.
Xiaomi 12 Pro मध्ये Snapdragon Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 12 GB LPDDR5 RAM आणि 256 GB स्टोरेज आहे. याशिवाय, फोनमध्ये तीन फ्लॅगशिप कॅमेरे, 50 मेगापिक्सेल (OIS सपोर्टसह), 50 मेगापिक्सेल पोर्ट्रेट आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
तसेच 5G फोनवर प्रचंड सूट मिळत आहे
भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. हे लक्षात घेऊन Xiaomi च्या या सेलमध्ये 5G फोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
Xiaomi ने नुकतेच लाँच केलेला Redmi K50i 5G Xiaomi इंडिपेंडन्स डे आणि राखी सेलमध्ये मोठ्या सवलतींसह खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन डायमेंसिटी 8100 प्रोसेसरसह 24,999 रुपयांना खरेदी करता येईल.
या फोनवरही उत्तम ऑफर्स
Xiaomi च्या या सेलमध्ये 10 हजार ते महागड्या फोनवर प्रचंड सूट दिली जात आहे. Xiaomi च्या Xiaomi इंडिपेंडन्स डे आणि राखी सेलमध्ये, 43,000 रुपये किंमतीचा 120W Xiaomi हायपरचार्ज 29,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
सेलमध्ये, 24,999 रुपयांचा मिड-रेंज Redmi Note 11 Pro + 5G फोन 5 हजारांच्या सवलतीनंतर 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, बजेट सेगमेंट Redmi 10A Sport (6 GB RAM + 120 GB स्टोरेज) रु. 10,999 मध्ये घेता येईल.
सेलमध्ये स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटची यादी