Xiaomi Smartwatch : बाजारात आता एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टवॉच लाँच होत आहेत. ज्यात अनेक शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतात. अनेक कंपन्या आपले स्मार्टवॉच बाजारात आणत असतात. Xiaomi ने आपले एक वॉटरप्रूफ स्मार्टवॉच लाँच केले आहे.
कंपनीचे Xiaomi Watch S3 स्मार्टवॉच काळ्या, चांदीच्या आणि तपकिरी रंगाच्या पर्यायांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर S3 च्या ई-सिम आवृत्तीची किंमत CNY 999 (अंदाजे रु. 11,368) आहे तर ब्लूटूथ मॉडेलची किंमत CNY 799 (अंदाजे रु. 9,092) आहे. परंतु हे स्मार्टवॉच सध्या चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जाणून च्या Xiaomi Watch S3 ची खासियत
दरम्यान, कंपनीने नव्याने लाँच केलेले Xiaomi Watch S3 Xiaomi च्या HyperOS वर चालत असून त्यात गोल डायलसह अदलाबदल करण्यायोग्य बेझल डिझाइन देण्यात आले आहे. याच्या वॉचफेसमध्ये विशेष डायनॅमिक अॅनिमेशन आणि ध्वनी प्रभाव उपलब्ध असून यामध्ये 600 nits ब्राइटनेससह 1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सर आणि 150 स्पोर्ट्स मोड सपोर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतील.
इतकेच नाही तर, यात 5ATM वॉटर रेझिस्टंट आहे, म्हणजे ते पाण्याच्या क्रियाकलाप आणि पोहण्याच्या वेळी परिधान करता येईल. यामध्ये 12-चॅनेल हृदय गती शोधण्याचे मॉड्यूल आणि अचूक GPS ट्रॅकिंगसाठी स्वतंत्र ड्युअल-फ्रिक्वेंसी फाइव्ह-सॅटेलाइट पोझिशनिंग देण्यात आली आहे.
यात 486mAh बॅटरी दिली असून जी सामान्य वापरावर 7 दिवसांपर्यंत आणि LTE आवृत्तीवर जास्त वापरासाठी 3 दिवसांपर्यंत टिकेल. तसेच या ब्लूटूथ व्हेरियंटची बॅटरी सामान्य वापरावर 15 दिवसांपर्यंत आणि AOD (नेहमी डिस्प्लेवर) चालू असताना 5 दिवसांपर्यंत टिकेल, असा कंपनी दावा करते.