नवी दिल्ली : आज शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजपवर (Bjp) व ईडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या अनेक प्रश्नाची आक्रमकपणे उत्तरे दिली आहे.
यावेळी ते शरद पवार(Sharad Pawar) तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील (Mahvikas aaghadi) नेतेही तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

तसेच ते म्हणाले, आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
दरम्यान, नितेश आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी (Sanjay Raut) थेट पंतप्रधान मोदींना (PM Modi) सवाल उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्याबद्दल राणे पुत्र बोलतात हे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदमध्ये उपस्थित केला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून ते अवघ्या देशाचे पंतप्रधान आहे. मोदी हे एका पक्षाचे नेतृत्व करतायेत. ते देशाचे पंतप्रधान आहे, भाजपचे नाही, असा खोटक टोलाही पंतप्रधानांना यावेळी राऊतांनी लगावला आहे.