PPF Investment Tips : PPF मधील गुंतवणुकीतून कमावू शकता करोडो रुपये, जाणून घ्या संपूर्ण गणित

Ahmednagarlive24 office
Published:

PPF Investment Tips : केंद्र सरकारकडून पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ ही गुंतवणूक योजना चालवली होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत सर्वसामान्यांना कमीत कमी रक्कमेत गुंतवणूक करता येते.

तसेच या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेच्या नियमांबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण सरकार सतत अल्पबचत योजनांचे नियम बदलत असते.

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

तसेच जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. कारण यात आयकर कलम 80C अंतर्गत सूट आहे. या योजनेत, तुम्ही तुमचे पैसे एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये गुंतवू शकता.

हे लक्षात ठेवा की तुम्हाला या योजनेमध्ये एकूण 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच तुम्ही मॅच्युरिटीनंतरही तुमचे पीपीएफ खाते 5 वर्षांसाठी वाढवू शकता. सध्या यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 7.1 टक्के इतके व्याज मिळत आहे.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही करोडो रुपयांचा निधी कमावू शकता. समजा जर तुम्ही या योजनेत एकूण 25 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले. तर तुम्ही एकूण 1,03,08,015 म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी 1 कोटीपेक्षा जास्त निधी गोळा करू शकाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe