Paneer Identification : फाटलेल्या दुधापासून बनवलेले पनीर आरोग्यासाठी उत्तम असते.कारण यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर असतात. तुम्ही कच्च्या पनीर सोबतच ते भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो.
परंतु, वाढत्या मागणीमुळे बाजारात नकली पनीर विकले जात आहे. ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. तुम्ही खात असेलेले पनीर असली आहे की नकली ते सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकते.
तुम्ही पनीर मॅश करून ते बनावट आहे की खरे ते शोधू शकता. खरंतर स्किम्ड मिल्क पावडरपासून बनावट पनीर बनवले जात असून ते हाताचा दाब सहन करू शकत नाही.
हाताने दाबल्यावर ते तुटते. जर तुम्ही असे पनीर खाल्ले तर तुमची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसेच आरोग्याशी निगडित अनेक समस्या उद्भवू शकतात.
आयोडीन टिंचरच्या मदतीने तुम्ही खरे आणि बनावट पनीर ओळखू शकता. सगळ्यात अगोदर तुम्हाला पॅनमध्ये पनीर टाकावे लागेल. यानंतर पॅनमध्ये पाणी ओतून ते पाणी सुमारे पाच मिनिटे उकळवावे लागेल.
थंड झाल्यावर पनीरवर आयोडीन टिंचरचे थोडे थेंब टाका. थेंब टाकल्यानंतर पनीरचा रंग निळा झाला तर आपले पनीर बनावट आहे, असे समजावे.