“नको तिथं बोटं घालायची सवय, तुमचं अजून झालं नाही, तेव्हा व्हायची लग्न”… राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंचा टोला

Content Team
Published:

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी भाष्य करत जोरदार टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक कार्यक्रमात बोलताना सावित्रिबाई फुले (Savitribai Phule) आणि महात्मा फुले यांच्या लग्नातील वयावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

तसेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयीची वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या अनेक स्तरातून टीका करण्यात आली. तसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांवर नक्कल करत टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो.

अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सुनावले आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून समाचार घेतला आहे. तुम्हाला काही माहितीये का? महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं.

रामदास स्वामींनी काय लिहीलेय, छत्रपतींनी काय लिहीलंय ते माझ्या घरात लावलंय मी. शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही.

वाचा ते निश्चयाचा महामेरू…कोण श्रीमंतयोगी…असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे राज्यपालांवर चांगलेच भडकल्याचे दिसले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe