अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सतत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अक्षयने नुकतंच मुंबईत एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे.
अक्षयचे मुंबईतील हे घर खार पश्चिम या ठिकाणी आहे. अक्षय कुमारने डिसेंबर महिन्यात अंधेरी पश्चिम येथे असणारे त्याचे ऑफिस विकले होते. याबदल्यात त्याला ९ कोटी रुपये रक्कम मिळाली होती.
ही प्रॉपर्टी विकल्यानंतर त्याने हा नवा फ्लॅट खरेदी केला आहे. त्याच्या या नवीन फ्लॅटची किंमत ७ कोटी ८४ लाख रुपये इतकी असल्याचे बोललं जात आहे. या फ्लॅटसोबत त्याला चार वाहनांच्या पार्किंगसाठी जागाही मिळाली आहे.
यासाठी अक्षय कुमारला ३९ लाख २४ हजार इतकी रक्कम स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागली आहे. या अपार्टमेंटचा रेडी रेकनर दर हा ७ कोटी २२ लाख इतका असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या अक्षय कुमार हा एका सी फेसिंग फ्लॅटमध्ये राहत आहे. या ठिकाणी अक्षय कुमार त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहत आहे. त्यासोबतच अक्षय कुमारची गोवा आणि मॉरिशसमध्येही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे.
अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. अलीकडेच अक्षय कुमारने त्याच्या आगामी एका चित्रपटासाठी १३५ कोटी रुपये फी घेतल्याचे समोर आले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम