Instagram Reels Earning Tips : जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल आणि तुम्हाला रील बनवण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नुकतीच रील बनवण्याची आवड असलेल्या लोकांसाठी इंस्टाग्रामने एक मोठे गिफ्ट दिले आहे.
कारण आता इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचा पर्याय समोर आला आहे, ज्याची रील जास्त लोकांना आवडेल, तो तितके पैसे कमवू शकतो. आता इंस्टाग्राम बोनस देण्यासोबतच आता नवीन गोष्टी देणार आहे. तुम्हीही यातून पैसे कमावू शकता. कसे ते जाणून घेऊया.

इन्स्टाग्रामवरून अनेकजण कमाई करत आहेत. जर तुम्हालाही रील बनवण्याची आवड असेल, तर तुम्हीही कमाई करू शकता. Instagram ने आपल्या वापरकर्त्यांना एक मोठी भेट दिली असून आता त्यांना पैसे कमावता येणार आहे.
रील बनवून कमाई करता येते
सध्या सोशल मीडियावर रीलला खूप मागणी आहे त्यामुळे अनेकजण रील अपलोड करत आहेत. जर तुम्हाला रील बनवायची आवड असेल तर आता तुम्ही रीलद्वारे कमाई करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे इन्स्टाग्राम असणे आवश्यक आहे आणि तुम्ही रील अपलोड करून कमाई करू शकता. लोकांच्या आवडीनुसार रील बनवून तुम्ही कमाई करू शकता.
त्यासाठी तुमचे खाते व्यवसाय किंवा निर्मात्याच्या खात्यात रूपांतरित करा
तसेच तुम्हाला आता तुमच्या खात्यात जाऊन काही सेटिंग्ज बदलण्याची आवश्यकता असणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचे खाते बिझनेस किंवा क्रिएटर अकाउंटमध्ये रूपांतरित करावे लागणार आहे. तसेच तुम्हाला रीलही रोज अपलोड करावी लागणार आहे. तुमची सामग्री मूळ असण्याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना ती आवडली पाहिजे.
असे करा खाते व्यवसाय किंवा निर्माते खात्यात रूपांतरित
- सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या Instagram प्रोफाइलवर क्लिक करावे लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला Settings मध्ये जाऊन Account वर क्लिक करावे लागणार आहे.
- येथे खाते प्रकारातील पर्याय असतील.
- यापैकी, तुम्ही व्यवसाय किंवा निर्माते खाते निवडावे लागेल.
- हे तुमचे खाते व्यवसाय किंवा निर्मात्याच्या खात्यात रूपांतरित होईल.
- तसेच तुम्हाला बोनसचा पर्याय मिळेल.
- जर तुम्हाला हा पर्याय सापडला नाही तर तुम्ही Instagram मदतीला संपर्क करू शकता.
असे कमवा पैसे
स्टार किंवा बोनसचे ऑप्शन फीचर काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर आले असून हे काही निर्मात्यांसाठी उपलब्ध केले आहे लवकरच हे फिचर प्रत्येकासाठी आणले जाणार आहे. त्यामुळे आता यूजर्स रिल्स अपलोड करून कमाई करू शकतील. रीलमध्ये वापरकर्त्याच्या नावासह गिफ्ट पाठवा पर्याय असेल, ज्या अंतर्गत अनुयायी रील निर्मात्याला भेट म्हणून स्टार पाठवू शकतात.
45 स्टार मिळाले तर, निर्मात्याला 95 रुपये मिळतील, तर 300 स्टार मिळाले तर, निर्मात्याला 550 रुपयांपर्यंत कमाई करता येईल. यामध्ये केवळ लाईक आणि स्टार सेंडच्या आधारे कमाई करता येते.