ABY : तुम्हालाही मिळेल पाच लाख रुपयांचा लाभ, त्यासाठी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Ahmednagarlive24 office
Published:

ABY : केंद्र सरकार आयुष्मान भारत योजनेत गरीब कुटूंब आणि शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. 2018 रोजी या योजनेला सुरुवात झाली असून देशभरात ही योजना चालवली जात आहे. त्यामुळे 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना लाभ मिळत आहे.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता आणि अटी निर्धारित केली आहे. जर तुम्ही या पात्रता आणि अटीमध्ये बसला तर तुम्हीही योजनेचा लाभ घेऊ शकता. या पात्रता आणि अटी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

जाणून घ्या काय आहे योजना आणि फायदे

सर्वात प्रथम हे जाणून घ्या की आयुष्मान भारत योजनेचे नाव बदलून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ असे केले आहे. कारण आता केंद्रासह काही राज्य सरकारेही यात सहभागी झाली आहेत. योजनेंतर्गत पात्र लोकांचे आयुष्मान कार्ड बनवले जातात आणि त्यानंतर कार्डधारकांना पॅनेल केलेल्या हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात.

या लोकांना होता येते सहभागी

स्टेप 1

सर्वात प्रथम तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागणार आहे.
त्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलला https://pmjay.gov.in/ भेट द्यावी लागणार आहे.

स्टेप 2

आता स्क्रीनवर दिसत असणाऱ्या ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाइल नंबरवर OTP येईल, तो येथे एंटर करा.
त्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय येतील, ज्यात तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागणार आहे.

स्टेप 3

तसेच तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून नंतर शोधावे लागणार आहे.
यानंतर तुम्हाला तुमची पात्रता कळेल की तुमचे आयुष्मान कार्ड बनले जाणार आहे की नाही ते समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe