Pan Card Alert : तुमचेही पॅन कार्ड असू शकते बनावट, अशाप्रकारे करा चेक

Published on -

Pan Card Alert : जर तुम्ही पॅन कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण काहीजण नकळत बनावट पॅन कार्ड वापरत असतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

परंतु, आता तुम्ही काळजी करू नका. काही स्टेपमध्ये तुम्ही तुमचे पॅन कार्ड बनावट आहे की खरे आहे ते तपासू शकता. त्यामुळे तुम्ही खुप मोठ्या संकटातून वाचू शकता.

असे करा चेक

2018 नंतर बनावट पॅनकार्ड बनवली जात आहेत. परंतु, तुम्ही आता पॅन कार्डवर असणाऱ्या QR कोडच्या मदतीने खऱ्या आणि बनावट पॅन कार्डमधील फरक ओळखू शकता.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

  • सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जावे लागेल तेथून आयकर विभागाने जारी केलेले पॅन क्यूआर कोड रीडर डाउनलोड करावे लागणार आहे.
  • ‘NSDL e-Governance Infrastructure Limited’ ने विकसित केलेले अॅप डाउनलोड करा.

स्टेप 2

  • त्यानंतर तुम्हाला डाउनलोड केलेले अॅप उघडावे लागेल.
  • त्यानंतर कॅमेरा व्ह्यूफाइंडरवर हिरवा प्लस असेल
  • या व्ह्यूफाइंडरने तुमच्या पॅन कार्डवरील QR कोड कॅप्चर करा.

स्टेप 3

  • तो कोड स्कॅन कॅप्चर करताच तुम्हाला बीप असा आवाज ऐकू येईल.
  • त्यानंतर तुमचा मोबाइल फोन पॅन तपशीलांसह व्हायब्रेट होईल
  • तुमच्यासमोर तुमच्या पॅन कार्डचे सर्व तपशील असतील.
  • येथे तुम्हाला मोबाईलमध्ये मिळालेली माहिती पॅनकार्डशी जुळवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला तुमचे पॅन कार्ड खरे आहे की बनावट आहे ते समजेल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!