अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-सामाजिक बांधिलकी जोपासत बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून सर्वांना संघटीत करुन समाजात काम केले. ओबीसी नेते व महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे हे काँग्रेस पक्षाचे काम पाहत आहे.
बारा बलुतेदारांचे प्रश्न व समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून श्रीगोंद्याचे नेते राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही युवा कार्यकर्ते यशस्वीपणे पार पाडू, असे प्रतिपादन ओबीसीचे युवा नेते अजय रंधवे यांनी केले.
मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गांधी भवनात काष्टी येथील ओबीसीचे युवा नेते अजय रंधवे यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पाटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
याप्रसंगी चंद्रपुरचे खासदार बाळासाहेब धानोरकर, चंद्रकांत गवळी, सतीश कसबे, मुकुंद मेटकर, राजेंद्र नागवडे, राकेश पाचपुते, चांगदेव पाचपुते उपस्थित होते. यावेळी विजय क्षीरसागर, सोमनाथ कदम, शरद शिंदे, किरण काळे, दिलीप शिंदे आदिंचे यावेळी पक्षात स्वागत करण्यात आले. यामुळे श्रीगोंदा तालुक्यात राजेंद्र नागवडे यांची ताकद वाढली आहे.
याप्रसंगी राजेंद्र नागवडे म्हणाले, युवकांना तालुक्यात काँग्रेस पक्षाचे काम आवडले असून, ओबीसी आरक्षणासाठी नाना पाटोलेंची भुमिका सर्वांना मान्य असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
या पक्षाच्या माध्यमातून त्यांना नक्कीच न्याय मिळेल, आम्ही त्यासाठी सहकार्य करु, असे सांगितले. या पक्ष प्रवेशवेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, कांतीलाल कोकाटे, इंद्रजित कुटे, राजेंद्र कुटे, महेश शिंदे, अजित शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम