July Grah Gochar : वेळोवेळी सर्व ग्रह त्यांच्या हालचालीने राशी बदलतात. जुलै महिन्यात देखील ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या महिन्यात भ्रमण करणार आहेत. 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. सेनापती मंगळ 12 जुलै रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
19 जुलै रोजी बुध कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करेल. आणि 31 जुलै रोजी शुक्र कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या हालचालीतील बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतील. ज्याचा 12 राशींवर थेट प्रभाव पडेल. काही राशींना या काळात सर्वाधिक फायदा होईल. तर काहींना नुकसान, आज आपण अशा अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना खूप फायदा होईल, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पाहूया…
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा महिना खूप खास असेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. भौतिक सुखसोयी वाढतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल, पदोन्नतीची शक्यता आहे. गुंतवणुकीत फायदा होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मेष
मेष राशीचे लोक या काळात खूप खुश असतील. या काळात अचानक पैसे मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये फायदा होईल. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक आणि शुभ कार्य पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते. प्रवासाची शक्यता आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना देखील भाग्यवान ठरेल. भौतिक सुखसोयी मिळतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिनाही अनुकूल राहील. पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. आर्थिक बाजूही मजबूत असेल.