Boiled Corn Benefit : मक्याचे 5 आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत?

Published on -

Benefits Of Boiled Corn : आपल्या सर्वांनाच मका खायला खूप आवडतो, तसे अनेकांनी मका भाजून खायला आवडतो, तर काहीजण मका उकडून खाणे पसंत करतात, पण उकडलेला मका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आज आपण आजच्या या लेखात उकडलेला मका खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

मका ऊर्जेचे भांडार मानले जाते. थोडं काम केल्‍यानंतर तुम्‍हाला अनेकदा थकवा जाणवत असेल, तसेच उर्जा कमी वाटत असेल, तर तुम्ही मक्याला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. विशेषत: उकडलेले मक्याचे सेवन केल्याने तुम्हाला लगेच ऊर्जा मिळेल, यात स्टार्च असते, जे ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

उकडलेल्या मक्याचे फायदे :-

-जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना वजन कमी करायचे आहे, तर तुम्ही तुमच्या आहारात उकडलेल्या मक्याचा समावेश करू शकता. यात कॅलरीजची संख्या कमी असते, ज्यामुळे आपले पोट दिवसभर भरल्या सारखे वाटते, आणि आपल्याला सारखी भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

-सध्या अनेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. कधी आजूबाजूच्या वातावरणामुळे असे घडते, तर कधी खराब आहार आणि जीवनशैलीमुळे असे घडते. याचा सामना करण्यासाठी तुम्ही उकडलेले कॉर्न तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, फिनोलिक फ्लेव्होनॉइड पिगमेंट अँटिऑक्सिडंट्सची पातळी चांगली असते. हे सर्व पोषक डोळे आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात.

-मका बी जीवनसत्त्वे, थायामिन आणि नियासिनने समृद्ध आहे, जे चांगल्या वाढीस मदत करते. तसेच आरोग्य सुधारते,इतकेच नाही तर मक्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड भरपूर असते. त्यामुळे गरोदर महिलांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. हे सर्व आरोग्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन ई असते, जे अँटिऑक्सिडंट्सचा नैसर्गिक स्रोत आहे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

-उकडलेल्या कॉर्नचे अनेक फायदे आहेत. पण असे असूनही मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे किंवा कमी खावे. तसे, त्यात फायबर असते. पण मधुमेहाच्या रुग्णांनी याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा परिणाम त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe