7th Pay Commission :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे, सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चच्या पगारासह कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त पगार येऊ शकतो.
असे मानले जात आहे कि, मार्च महिन्याच्या पगारासह वाढीव DA (DA hike 2022) आणि मागील 2 महिन्यांच्या थकबाकीचे पैसे सरकार ट्रांसफर करू शकते.
सरकारी कर्मचार्यांना सध्या 31 टक्के डीए दिला जात असला, तरी हा डीए वाढवून 34 टक्के केला जाणार असल्याचे मानले जात आहे. हा वाढीव डीए 1 जानेवारी 2022 रोजी लागू होणार होता, परंतु सरकार मार्चमध्ये हा डीए लागू करू शकते.
सरकारने मार्चमध्ये त्याची अंमलबजावणी केल्यास त्याचे पैसे या महिन्याच्या पगारात दिले जातील. यासोबतच कर्मचार्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकीही मिळेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाईल. होळीनंतर कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील.
जर तुमचा मूळ पगार 18000 ते 56900 रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही 34 टक्के दराने DA काढला तर तुमचा महागाई भत्ता दरमहा 19,346 रुपये होईल. तसेच कर्मचाऱ्यांना 17,639 रुपये थकबाकी मिळत आहे.
खात्यात 38692 रुपये जादा येतील –
कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये एकूण 1,707 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर त्याची गणना केली तर ते सुमारे 20,484 रुपये होईल. कर्मचाऱ्यांना मार्चमध्ये 2 महिन्यांची थकबाकी दिली जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 38692 रुपये थकबाकी म्हणून येतील.
या कर्मचाऱ्यांचा डीएही वाढला आहे –
अलीकडेच केंद्रीय सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यात आली. यापूर्वी कर्मचाऱ्यांना सुमारे 170 टक्के डीए मिळत होता,
त्यात 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. आतापासून कर्मचाऱ्यांना 184 टक्के डीए मिळेल. सरकारने या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये १४ टक्के वाढ केली आहे.