Mangal Shani Yuti 2024 : ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांमध्ये न्यायदेवता शनि आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांना महत्वाचे स्थान आहे. जेव्हा-जेव्हा हे दोन ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर खोलवर प्रभाव दिसून येतो. या काळात काहींना चांगले परिणाम मिळतात तर काहींना वाईट परिस्थितीला समोरे जावे लागू शकते.
ज्योतिष शास्त्रानुसार होळीच्या आधी या दोन ग्रहांमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हे दोन ग्रह कुंभ राशीमध्ये एकत्र येणार आहेत. उर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक असलेला मंगळ 15 मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शनी आधीच उपस्थित आहे, अशा स्थितीत 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये मंगळ-सूर्यचा संयोग होणार आहे जो काही राशींना विशेष परिणाम देणार आहे.

मेष
कुंभ राशीमध्ये मंगळ आणि शनि यांच्या संयोगाने लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात नशिबाची पूर्ण साथ असेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडूनही तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ
शनीच्या राशीत मंगळाचा प्रवेश लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाचा विस्तार होईल, आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. नातेसंबंधांमुळे विवाह होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती आणि प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नतीसह विशेष लाभ मिळू शकतात. परदेशातही नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, संपत्तीही वाढेल.
मकर
कुंभ राशीतील शनि आणि मंगळाची युती मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होईल. या लोकांचा होळीपूर्वी सुवर्णकाळ सुरू होईल. तसेच अनपेक्षित पैसे मिळू शकतात. अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात. या काळात आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि तुमच्या कामात प्रगतीही होईल.
धनु
मंगळ आणि शनीचा योग तुमच्यासाठी अनुकूल राहील.नोकरीमध्ये मान-प्रतिष्ठा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला नशीब मिळेल. व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. मुलांकडून आनंद मिळू शकेल. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनातही फायदा होईल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल. जे लोक क्रीडा आणि संरक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना त्यांच्या शौर्याचा सन्मान मिळेल.