Surya Shukra Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, ज्यामुळे ग्रहांचा संयोग, योग आणि राजयोग तयार होतात. जूनप्रमाणेच जुलै महिन्यातही सूर्य आणि मंगळासह चार प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत, यामध्ये दानवांचा गुरू शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्याचे देखील संक्रमण होणार आहे. 6 जुलै रोजी कला, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक शुक्र आणि 16 जुलै रोजी आत्मा राशीचा कारक सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे या दोन्ही ग्रहांचा संयोग तयार होईल. जो तीन राशींसाठी खूप शुभ मानला जात आहे. कोणत्या त्या राशी पाहूया…
कर्क
शुक्र आणि सूर्याचा योग राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात आत्मविश्वास वाढेल. तसेच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या कामातही फायदा होईल आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. व्यवसायात इतर स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीत बढतीचा लाभही मिळू शकतो.
तूळ
रवि आणि शुक्राच्या संयोगाने लोकांना भरपूर लाभ मिळतील. नोकरीत पदोन्नतीबरोबरच व्यवसायातही फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात चांगल्या ऑफर मिळतील. नोकरी-व्यवसायात लक्षणीय प्रगती होऊ शकते. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल.
कन्या
रवि आणि शुक्राचा योग कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. करिअरमध्ये नवे विक्रम प्रस्थापित कराल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. व्यवसायात मोठी रक्कम मिळू शकते. व्यवसायात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो आणि नवीन उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होऊ शकतात.