पुष्पानंतर अल्लू अर्जुनाचा ‘हा’ सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- ‘पुष्पा’ चित्रपट सर्व भाषांमध्ये हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. आता अल्लू अर्जुनच्या या लोकप्रियतेच्या फायदा घेण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

त्यामुळे तेलुगूमध्ये हिट ठरलेले त्याचे इतर सिनेमा हिंदीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच दृष्टीने मागील वर्षी हिट ठरलेला ‘अला वैकुंठपुरामुलू’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला.

तसेच पुढील महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांना पहाता देखिल येणार आहे. हा सिनेमा सिनेमा गृहामध्ये प्रदर्शित केला जाणार होता. पण याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बॉलिवूड मध्ये ‘शहजादा’ या नावाने बनविला जात आहे.

तसेच यामध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत आहे. शहजादाचे दिग्दर्शक आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांनी गोल्डमाईन्स यांना विनंती केल्यावर ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा चित्रपट सिनेमा गृहात रिलीज करण्याचे रद्द करण्यात आले.

]‘अला वैकुंठपुरामुलू’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गोल्डमाईन्स प्रोडक्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन हा ट्रेलर शेअर केला आहे.

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना देखिल या चित्रपटाचा ट्रेलर आवडताना दिसतो आहे. अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा सिनेमा २०२० सालातील सर्वात मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर साऊथच्या प्रादेशिक भाषेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आता ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा चित्रपट हिंदीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी ढिन्चॅक या चॅनलवर पाहता येणार आहे.