एकाच रिचार्जमध्ये दोन सिमकार्डचा वापर! Airtel चा दमदार नवा प्लान; मिळणार ११ खास फायदे

Published on -

Airtel Plan : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या तब्बल 36 कोटी ग्राहकांसाठी एक खास आणि कुटुंबाभिमुख पोस्टपेड प्लान सादर केला आहे. ‘Infinity Family Postpaid Plan’ असे या नव्या प्लानचे नाव असून, एकाच प्लानमध्ये दोन सिम कार्ड्स वापरण्याची सुविधा, मोठ्या प्रमाणात डेटा आणि अनेक प्रीमियम सब्सक्रिप्शनचा लाभ मिळणार आहे. हा प्लान फॅमिली युजर्ससाठी किफायतशीर आणि ऑल-इन-वन पॅकेज ठरण्याची शक्यता आहे.

एअरटेलचा हा 699 रुपये + GST प्रतिमहिना दराचा पोस्टपेड प्लान असून, यामध्ये कुटुंबातील दोन सदस्यांना एकाच बिलावर जोडता येते. म्हणजेच, वेगवेगळ्या रिचार्जऐवजी एकाच प्लानमध्ये दोन सिम्सचा वापर करता येणार आहे. यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.

या प्लानअंतर्गत ग्राहकांना संपूर्ण भारतात अनलिमिटेड मोफत कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि दररोज 100 मोफत SMS सुविधा दिली जात आहे. त्यामुळे कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी वेगळ्या प्लानची गरज भासत नाही.

डेटाच्या बाबतीतही हा प्लान भरघोस फायदे देतो. या प्लानमध्ये एकूण 105GB मासिक डेटा उपलब्ध आहे. यामध्ये प्रायमरी सिमसाठी 75GB आणि सेकंडरी सिमसाठी 30GB डेटा दिला जातो. जास्त डेटा वापरणाऱ्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

याशिवाय, एअरटेल या प्लानसोबत अनेक प्रीमियम अ‍ॅड-ऑन बेनिफिट्स देत आहे. यामध्ये Amazon Prime चे 6 महिन्यांचे सब्सक्रिप्शन, JioHotstar Mobile चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, Google One (100GB क्लाउड स्टोरेज),

Airtel Xstream Play Premium, तसेच Adobe Express Premium चे 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. यासोबतच Airtel Fraud Detection आणि Spam Protection सारख्या ऑनलाइन सुरक्षा सुविधा देखील मिळणार आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना डिजिटल मनोरंजन, क्लाउड स्टोरेज आणि सुरक्षिततेचा एकत्रित अनुभव मिळेल. त्यामुळे Airtelचा 699 रुपयांचा ‘Infinity Family Postpaid Plan’ हा फॅमिली युजर्ससाठी एक स्मार्ट आणि व्हॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News