अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- जे चित्रपट मी माझ्या पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही, असे चित्रपट मी स्वीकारत नाही किंवा अशा चित्रपटांपासून मी लांब राहतो, असे अल्लू अर्जुन(Allu Arjun) याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
त्यासोबतच ‘प्रेक्षकांना काही झालं तर मला त्यांची काळजीही घ्यावी लागेल. हे एक प्रकारे देवाणघेवाणीचं नातं आहे. प्रेक्षकांनी आपल्याला इतकं काही दिलं आहे.

त्याच्या बदल्यात आपण काही परतफेड करु शकल्यास हे भाग्यच’, असं अल्लू अर्जुन यावेळी म्हणाला आहे. अल्लू अर्जुन याची लोकप्रियता खूप आहे.
अनेकजण त्याची स्टाइल फॉलो(Style Follow) करत आहेत. नुकतेच ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटातील त्याची स्टाइल सोशल मीडिया(Social Media) वर खूप प्रसिद्ध झाली आहे.
तसेच त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अल्लू अर्जुन हा व्यावसायिक चित्रपट साकारताना मुलांना कोणताही संकोचलेपणा वाटणार नाही तर, महिलांनाही चित्रपट पहाताना संकोच वाटू नये यासाठी विशेष काळजी घेतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम