अमिताभ बच्चन पुन्हा झाले आजोबा, शेअर केली गुड न्यूज ..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. अमिताभ यांच्या कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला आहे. त्यांच्या जावयाने यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

सिने अभिनेता कुणाल कपूर आणि नयना बच्चनला मुलगा झाला आहे. कुणालने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर कुणालने लिहिले आहे,”नैना आणि मी आता आई-बाबा झालो आहोत.

मला हे सांगताना खूप आनंद होत आहे. देवाचे आभार मानतो”. कुणालची पत्नी नयना बच्चन ही बिगबींच्या भावाची मुलगी आहे. कुणालच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत त्याचे अभिनंदन करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!