कडुलिंबाच्या झाडावर अज्ञात रोगाचा हल्ला…हिरवीगार पाने गळतायत

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  कडूलिंबाच्या झाडाला गेल्या काही दिवसांपासून अज्ञात रोगाने हैराण केले आहे. या रोगराईमुळे झाडाची हिरवीगार पाने जळून जाताना दिसत आहेत.(Neem tree information)

नेमके कोणता हा रोग आहे आन यावर काय उपाय करणे आवश्यक आहे, याचे संशोधन व्हावे, अशी मागणी ग्रामिण भागातून केली जात आहे.

सगळीकडे उपलब्ध असलेल्या या कडूलिंबाचा वेगवेगळ्या आजारावर घरगुती इलाज म्हणून शेकडो वर्षे वापर केला जात आहे. कडुलिंबाची पाने, पानापासून रस, कोवळी काडी याचा आजही आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी वापर केला जात आहे.

गेली शेकडो वर्षे आयुर्वेदात कडूलिंबाचे हे महत्त्व टिकून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अज्ञात रोगाने कडुलिंबाची पाने गाळून पडू लागली आहे. ठिकठिकाणी या कडूलिंबाची हिरवीगार पाने थेट करपून जाताना दिसत आहते.

सगळ्या ऋतुत दिमाखात दिसणारे कडूलिंबाचे झाड हिवाळ्यातच वाळलेले दिसत आहे. वेळीच याकडे संशोधकांनी लक्ष दिले नाही तर हा वृक्ष नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.

या आयुर्वेदातील गुणकारी वृक्षाला वाचविण्यासाठी त्या रोगाचे संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.