Anemia : बऱ्याचशा लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता (Anemia) असते. या समस्येकडे (Prtoblem) वेळीच लक्ष दिले नाही तर मोठ्या समस्येला (Big Problem) तोंड द्यावे लागते.
रक्ताची कमतरता असल्याने अशा लोकांना अशक्तपणा (Weakness) येतो. अशा परिस्थितीत या लोकांना कोणत्याही औषधांशिवाय (Medicine) फरक पडतो. दररोज सुक्या द्राक्षांमध्ये (Dried grapes) मध (Honey) मिसळून खाल्ला तर ते फायदेशीर ठरते.

सुक्या द्राक्षात मध मिसळून खा
सुकी द्राक्षे आणि मध भरपूर प्रमाणात पोषक असतात. याचे सेवन केल्याने शरीराला पुरेसे पोषण तर मिळतेच शिवाय आजारही दूर राहतात. सर्दी, खोकला, कफ यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो.
या दोन्हीमध्ये कॅल्शियम, लोह तसेच आवश्यक पोषक गुणधर्म आहेत. ते खाण्यासाठी सर्वप्रथम ६-७ मनुके रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये मध मिसळून सेवन करा.
हे दोन्ही खाण्याचे फायदे
शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासोबतच सुकी द्राक्षे आणि मध रक्तदाब नियंत्रणात खूप उपयुक्त आहेत. म्हणजेच ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात नाही, त्यांनी याचे सेवन अवश्य करावे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला आहे.
पचनसंस्थेला बळकट बनवण्यासाठी या दोन्हींचा खूप उपयोग होतो. ज्या लोकांना रोज पोटदुखी असते ते देखील याचे सेवन करू शकतात.रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच ते तुमच्या त्वचेसाठीही खूप उपयुक्त आहे. अशा लोकांनी त्याचा आहारातही समावेश करावा.