Astro Tips : प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधी ना कधी समस्या येतात. अशी समस्या टाळण्यासाठी जोतिषात अनेक उपाय दिले आहे, आज आपण त्याचबद्दलच जाणून घेणार आहोत.
बऱ्याचवेळा चालू असलेल्या अडचणींमुळे व्यक्तीला शांतपणे झोप देखील येत नाही. असे व्यक्ती झोपायचा खूप प्रयत्न करतात. परंतु जोपर्यंत आपल्या आयुष्यात सर्वकाही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शांत झोप मिळणे फार कठीण आहे.

माणसासाठी जशी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे, झोपण्यापूर्वी काही साधे ज्योतिषीय उपाय केले तर एखाद्या व्यक्तीचे दुर्दैव काही वेळातच चांगल्या दिवसांमध्ये बदलू शकते. चला या खास उपायांबद्दल जाणून घेऊया…
घरी कापूर जाळणे
कापूर जाळण्याचे ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व मानले जाते. कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळला पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-शांती नांदते.
पैसे मोजल्यानंतर झोपा
दररोज झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्यकडे असलेले पैसे मोजल्या पाहिजेत. यासाठी तुम्ही नोटांचे बंडल तुमच्याजवळ ठेवू शकता आणि दररोज झोपण्यापूर्वी ते मोजू शकता. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.
देवाला प्रार्थना
जर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या आवडत्या देवाची प्रार्थना केली आणि त्याला तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यास सांगितले, तर देव नक्कीच तुमचे ऐकेल. रात्री देवाला केलेली ही प्रार्थना तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करेल.
दिशाकडे लक्ष द्या
झोपताना दिशा लक्षात ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. झोपताना पायांच्या दिशेकडे लक्ष दिले नाही तर जीवनात नकारात्मकता येऊ शकते. झोपताना तुमचे पाय दाराकडे नसावेत हे लक्षात ठेवा.