Delv AI : भारतातील 16 वर्षीय मुलीने टेक्नोलॉजी क्षेत्रात सध्या धुमाकूळ घातलाय. प्रांजली अवस्थी असं या मुलीचं नाव आहे. या मुलीने करोडो रुपयांची एआय कंपनी स्थापन केली आहे. विशेष म्हणजे तिच्या या कंपनीत 10 लोक काम करतात.
म्हणजे ज्या वयात मुलं विद्यालयात शिक्षण घेत असतात त्या वयात प्रांजली यांनी एआय कंपनी स्थापन केली आहे. तिने Delv.AI नावाचा एआय स्टार्टअप सुरू केला आहे. या कंपनीची व्हॅल्युएशन 12 मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.

या यशाचे श्रेय त्याने वडिलांना दिले
प्रांजली अवस्थी यांनी मियामी टेक वीक इव्हेंटमध्ये सांगितले की, तिने जानेवारी 2022 मध्ये आपल्या कंपनीची स्थापना केली आणि आतापर्यंत सुमारे 3.7 कोटी रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत. म्हणजेच 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे.
कंपनीच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार सध्या कंपनीत 10 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रांजली तिच्या यशस्वीततेचे श्रेय तिच्या वडिलांना देते. प्रांजलीने वयाच्या 7 व्या वर्षी कोडिंग ला सुरुवात केली. प्रांजलीला जेव्हा तिच्या वडिलांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करून त्यात करिअर करण्यास सांगितले तेव्हा साहजिकच तिचा ओढा विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे ओढला गेला.
वयाच्या 11 व्या वर्षी तिचे कुटुंब फ्लोरिडा येथे स्थायिक झाले. तेव्हा तिला तेथे चांगल्या संधी मिळाल्या आणि तिने संगणक विज्ञान वर्ग आणि स्पर्धात्मक गणित कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पुढे वयाच्या 13 व्या वर्षी प्रांजली यांनी फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये इंटर्नशिप केली, तिथून तिने स्वत:ची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि या दिशेने काम करण्यास सुरुवात केली.
कोरोना काळात मोकळ्या वेळेचा पुरेपूर फायदा घेतला
इंटर्नशिपदरम्यान तिने मशीन लर्निंग प्रोजेक्टवर काम केले आणि आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी, ओपन एएआयने चॅट जीपीटी बीटा 3 देखील लॉन्च केले, ज्यामुळे तिला एआय वापरुन संशोधन डेटा काढण्याची आणि सारांशित करण्याची कल्पना मिळाली. याच काळात Delv.AI ची आयडिया तिने मांडली. आणि कामाला सुरुवात झाली. डेटा एक्सट्रैक्शन सुधारण्यासाठी आणि डेटा सायलो काढून टाकण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करणे हे तिचे उद्दीष्ट होते.
ऑन डेक आणि व्हिलेज ग्लोबल कडून फंडिंग प्राप्त
मियामीमधील बॅकएंड कॅपिटलच्या लुसी गुओ आणि डेव्ह फॉन्टेनॉट यांनी प्रांजलीच्या एआय स्टार्टअप एक्सलेटरमध्ये सामील झाल्यावर प्रांजली अवस्थीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. Delv.AI चे प्रोडक्ट हंटवरील बीटा लाँच हे विलक्षण यश असल्याचे त्यांनी उघड केले आणि तेथून त्यांनी त्यावर आणखी चांगल्या प्रकारे काम करण्यास सुरुवात केली.
प्रॉडक्ट हंट हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जे कोणालाही त्यांचे सॉफ्टवेअर लोकांसोबत विनामूल्य शेअर करण्यात मदत करते. प्रांजलचे म्हणणे आहे की Delv.AI चे प्राथमिक उद्दिष्ट संशोधकांना वाढत्या ऑनलाइन सामग्रीमध्ये कार्यक्षमतेने विशिष्ट माहिती मिळवण्यात मदत करणे आहे.
प्रांजलीला ऑन-डेक आणि व्हिलेज ग्लोबलमधून गुंतवणूक सुरक्षित करण्यात एक्सीलरेटर प्रोग्रामने महत्त्वाची भूमिका बजावली. Delv.AI एकूण 4,50,000 डॉलर (सुमारे 3.7 कोटी रुपये) निधी फंड गोळा केला आणि सध्या कंपनीचे मूल्यांकन 12 मिलियन डॉलर आहे.