अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना दिली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या विकेंडला एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा प्रभावित राहणार आहे.
एसबीआयने आपल्या ट्विटर हँडवरून ही माहिती दिली आहे. यामध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाईट, योनो बिझनेस आणि युपीआय सारख्या सेवा असणार आहेत.
या सेवा काही काळासाठी बंद करण्यात येणार असल्याने ग्राहक त्यावर व्यवहार करू शकणार नाहीत, असे एसबीआयने कळविले आहे. बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अपग्रेड करत असल्याने ही सेवा बंद राहणार आहे.
याचा काळही एसबीआयने कळविला आहे. दरम्यान या सेवा १९ फेब्रुवारीला ११ वाजून ३० मिनिटांपासून २० फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर २ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
तंत्रज्ञान अपग्रेड कामामुळे या सेवा उपलब्ध होणार नाहीत. “आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो कारण आम्ही एक उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.”