Side Effects of Tea : हिवाळ्यात जास्त चहा पीत असाल तर सावधान ! होऊ शकतात ‘हे’ वाईट परिणाम !

Content Team
Published:
Side Effects of Tea

Side Effects of Tea : भारतातील जवळ-जवळ प्रत्येक घरातील सकाळची सुरुवात ही चहाने (Tea ) होते. हिवाळ्यात याचे प्रमाण अधिकच वाढते. लोकांना हिवाळ्यात गरम चहा प्यायला खूप आवडते तसेच गरम चहामुळे शरीर गरम होण्यास देखील मदत होते. पण जर तुम्ही जास्त चहा घेत असाल तर सावधान! कारण चहा आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतो (Side Effects of Tea). होय, चहाचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातून अनेक वेळा चहा प्यायल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामध्ये असलेले टॅनिन नावाचे पदार्थ तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता कमी करते. त्यामुळे अनेक आजार होतात. जास्त चहा प्यायल्याने पचनक्रिया देखील बिघडते. तसेच शरीरात अनेक समस्या निर्माण होता. कोणत्या जाणून घ्या…

जास्त चहा पिण्याचे नुकसान !

-जर तुम्ही जास्त चहाचे सेवन केले तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक आजारांचा धोका होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

-असलेल्या कॅफिनमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे निद्रानाश, थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

-जास्त चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची समस्या निर्माण होते, कारण त्याच्या सेवनाने लघवी जास्त होते.

-जास्त चहा प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी सारखी समस्या उद्भवते.

-चहाच्या अतिसेवनाने मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. त्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका आहे.

-चहाच्या अतिसेवनामुळे मळमळ सारख्या समस्या दिसू शकतात. त्यामुळे उलटीची समस्या वाढते.

-बरेच लोक दिवसातून 3-4 वेळा चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने पोटात ऍसिडिटी वाढते. जास्त चहा प्यायल्याने तोंडात अल्सरही होतात.

-चहा प्यायल्यानेही आतडे खराब होतात. त्यामुळे अन्न पचण्यात देखील अडचणी येतात.

-जास्त चहा पिण्याच्या अनेक तोट्यांपैकी एक म्हणजे जास्त चहा प्यायल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयविकार होण्याची शक्यताही वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe