Beauty Tips :- कढीपत्ता कुणाला माहित नाही. गावोगावी कुठेही उपलब्ध असणारे हे झाड आहे. कढीपत्ता अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. या पानांचा वापर केल्याने टाळूचे नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स दूर होतात.
इतकंच नाही तर कढीपत्त्याच्या वापराने केसांना अनेक फायदे मिळतात. या पानांमध्ये बी जीवनसत्त्वे देखील असतात ज्यामुळे केसांच्या मुळांना फायदा होतो. या पानांचा योग्य वापर केल्यास केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो आणि केस गळणे, पातळ होणे आणि कोंडा यापासूनही आराम मिळतो. कढीपत्ता केसांना कसा लावावा ते जाणून घ्या.
केस गळती
केस सारखे गळत राहिले तर डोक्यावरील केस कमी होतील. अशावेळी कढीपत्त्याचे तेल केसांना लावता येते. यासाठी मूठभर कढीपत्ता घेऊन त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे गरम खोबरेल तेल घाला म्हणजे ते पातळ होईल. आता या तेलाने केसांना मसाज करा आणि कमीत कमी एक तास राहू द्या आणि नंतर केस धुवा. केसगळती कमी होईल.
कढीपत्ता हेअर मास्क
एका बाऊलमध्ये दही आणि कढीपत्ता एकत्र मिक्स करा. तुमचा कढीपत्ता हेअर मास्क तयार झाला. हा हेअर मास्क टाळू आणि केसांवर लावा. या हेअर पॅकचा अप्रतिम परिणाम होतो. याशिवाय केसांची वाढ आणि केस मऊ होण्यासाठीही हा हेअर मास्क फायदेशीर ठरतो. अर्धा तास डोक्यावर ठेवल्यानंतर ते धुवून टाका.
आवळा व कढीपत्ता
आवळा व कढीपत्ता एकत्र मिसळून घ्या. ते लावा. केस पातळ होण्याची समस्या दूर होते. आवळ्याचे छोटे तुकडे करून त्यात कढीपत्ता घाला. त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून एक ते दीड तास राहू द्या आणि नंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने कढीपत्ता डोक्यावर लावल्यास केस दाट होण्यास मदत होते.
कढीपत्ता पाणी
कढीपत्त्याचे पाणी कुरळे किंवा कोरड्या केसांवर लावता येते. त्यासाठी एक कप पाण्यात मूठभर कढीपत्ता घालून ते उकळून घ्या. पाणी थंड होऊ द्या. ते गाळून एका स्प्रे च्या बाटलीत भरा. ते आपल्या कुरळे केसांवर फवारा. यामुळे केसांचा कुरळेपणा कमी होईल.