Benefits Of Black Pepper : खोकल्याने त्रस्त आहात?, रोज सकाळी प्या ‘हा’ आयुर्वेदिक चहा !

Benefits Of Black Pepper

Benefits Of Black Pepper : महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. हवामानातील गारव्यासोबतच आरोग्य समस्याही वाढत आहेत. थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. खोकल्यामुळे रात्रीची झोपही भंग पावते. जर तुम्हाला हिवाळ्यात खोकल्याचा त्रास होत असेल तर आज आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यास तुम्हाला या समस्येतून लगेच अराम मिळेल.

खोकल्यामध्ये काळी मिरी वापरणे फायदेशीर ठरते, जर तुम्ही सकाळी काळी मिरीचे सेवन केल्यास खोकल्याची समस्या कमी होऊ शकते. चला याच्या वापराबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

काळी मिरीचे फायदे

-काळ्या मिरीमध्ये विविध पोषक तत्वांसह अँटीऑक्सिडंट असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

-काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

-कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस समृद्ध, काळी मिरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्याच्या सेवनाने खोकल्यापासून आराम मिळतो.

खोकल्यासाठी काळी मिरी चहा कसा बनवायचा?

काळी मिरी चहा बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचा काळी मिरी (पावडर), १ चमचे चहाची पाने, १ कप पाणी आणि मध (चवीनुसार) लागेल. चहा बनवण्यासाठी प्रथम पातेल्यात पाणी उकळून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. मग यामध्ये चहाची पाने आणि काळी मिरी पावडर मिसळा आणि उकळू द्या. चहा उकळायला लागल्यावर गाळणीच्या साहाय्याने कपमध्ये गाळून घ्या. तुमच्या चवीनुसार तुम्ही या चहामध्ये मध घालू शकता. हिवाळ्यात हा काळी मिरी चहा प्यायल्यास खोकल्याची समस्या कमी होते.

काळी मिरी चहाचे फायदे

-हिवाळ्यात रोज काळी मिरी चहा प्यायल्याने तुमची पचनशक्ती सुधारते.

-दिवसाची सुरुवात काळी मिरी चहाने करा आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.

-ज्यांना थकवा येतो त्यांच्यासाठी काळी मिरी चहा फायदेशीर ठरू शकतो.

-हा चहा प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारेल, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होईल.

-अपचनाचा त्रास असलेल्या लोकांसाठीही काळ्या मिरीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

-काळी मिरी खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार कमी होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe