Amla Juice Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी पिण्याचे फायदे, चेहऱ्यापासून ते केसांपर्यंत…

Content Team
Published:
Amla Juice Benefits

Amla Juice Benefits : आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्व दिले जाते. कारण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामधे व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्या आरोग्यला अनेक फायदे मिळतात, आवळा हे आयुर्वेदात अनेक आजारांवर औषध म्हणून वापरले जाते. तसा आवळ्याचा प्रभाव हा थंड असतो, त्यामुळे पित्ताशी संबंधित आजारांमध्ये लगेच अराम मिळतो.

अनेक लोक आवळा हे फळ म्हणून खातात त्याच वेळी, बरेच लोक त्याची पावडर, रस किंवा मुरंबा स्वरूपात खातात. आजच्या या लेखात, आपण त्याच्या विविध फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग…

आवळ्याचे चमत्कारिक फायदे :-

-आवळ्याच्या रसात फायबर, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

-आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हा रस प्यायल्याने संसर्ग आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते.
आवळ्याचा रस रोज प्यायल्याने सर्दी-खोकला यांसारखे हंगामी आजार टाळता येतात.

-आवळ्याच्या रसात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. हे पचन सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करते. आवळ्याचा रस रोज सेवन केल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यापासून मुक्ती मिळते.

-तसे आवळ्याच्या रसाचा प्रभाव खूप थंडावा असतो. म्हणूनच उन्हाळ्यात या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. आवळ्याचा रस छातीत जळजळ शांत करण्यास मदत करतो. तसेच पित्ताच्या समस्येसेतून अराम देतो.

-आवळ्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. आवळ्याचा रस हृदयाचे आरोग्य सुधारतो. याचे सेसन केल्यास कोलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकते. आवळ्याचा रस डोळ्यांनसाठीही खूप फायदेशीर आहे.

-जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आवळ्याचा रस पिणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. यात अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत, जे साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

-तसेच आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. आवळ्याचा रस त्वचेवरील डाग दूर करतो. तसेच त्वचा सुधारण्यास मदत होते. आवळ्याचा रस रोज प्यायल्याने वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतात.

-तुम्ही आवळ्याचा रस पाण्यात मिसळून घेऊ शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात 1-2 चमचे आवळ्याचा रस घाला. आता तुम्ही हा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe