हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवताय का ? मग पुण्याजवळ कधी न पाहिलेल्या ‘या’ लोकेशनला आवर्जून भेट द्या

Published on -

Best Picnic Spot : हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण हिवाळ्यात पिकनिक साठी बेस्ट असणारे पुण्याजवळील टॉप 5 लोकेशन संदर्भात माहिती पाहणार आहोत.

हे आहेत पुण्यातील बेस्ट टुरिस्ट स्पॉट

कासारसाई धरण : तुम्ही पण हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर या धरणाला अवश्य भेट द्या. येथील सनसेट पॉईंट हा फारच मजेशीर आहे. या धरणावरून सनसेट पाहण्याची मजा काही औरच आहे. शांत वातावरण आणि सुंदर लेकं व्हू यामुळे हा परिसर पर्यटकांमध्ये लोकप्रिय बनत चालला आहे.

मोरांची चिंचोली : पर्यटकांमध्ये हे सुद्धा डेस्टिनेशन हॉट फेवरेट बनत चालले आहेत. जे लोक पुण्यात राहतात ते वीकेंडला येथे जाऊ शकतात. वन डे ट्रिप साठी सुद्धा हे डेस्टिनेशन फारच सोयीचे आहे. येथे तुम्हाला सुंदर मोर पाहायला मिळतात.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येथील मोरांची संख्या वाढते आणि म्हणूनच याला मोरांची चिंचोली म्हणून ओळखले जाते. तुम्हाला तुमच्या परिवारासमवेत हिवाळ्यात पिकनिकला जायचे असेल तर नक्कीच हा एक बेस्ट पॉईंट राहणार आहे.

टेमघर धरण : हिवाळ्यात पिकनिकला जाणार असाल तर पुण्याजवळील हे डेस्टिनेशन सुद्धा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते. मुळशी रोडवरील हे धरण पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. पिकनिक साठी तसेच फोटोग्राफीसाठी हे ठिकाण फारच बेस्ट आहे. जर तुम्हाला प्री-वेडिंग फोटोशूट करायचा असेल तर तुम्ही या डेस्टिनेशनला नक्कीच भेट द्या.

देवकुंड धबधबा : देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात सर्वाधिक एक्सप्लोर केल जाणार पुण्याजवळील एक बेस्ट टुरिस्ट स्पॉट म्हणून ओळखले जाते. येथे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला दिसते.

विशेष म्हणजे फक्त पावसाळ्यातच नाही तर हिवाळ्यात सुद्धा येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होतो पण तरीही येथील सुंदर निसर्ग पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतो. हिवाळ्यात येथील निळसर पाण्याचा तलाव फारच आकर्षक दिसतो.

टिकोना किल्ला : हे ठिकाण सुद्धा पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून उदयास येऊ लागले आहे. तुम्ही जर इथे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गेला तर या किल्ल्यावरून खाली जे पवन लेकचे दृश्य दिसते ते खरंच पाहण्यासारखे आहे. ट्रेकिंग साठी सुद्धा हा किल्ला एक बेस्ट ऑप्शन ठरतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News