Best Time To Measure Weight : वजनवाढ किंवा कमी वजन असणे, या दोन्ही समस्या मोठ्या प्रमाणात तरुणवर्गात किंवा लोकांच्यात आहेत. अशा वेळी वजन अधिक असणे हे तुमच्यासाठी घातक असू शकते.
तर कमी वजन तुम्हाला अनेक मानसिक त्रास देत असते. अशा वेळी जर तुम्हीही वजन कमी अथवा वाढलेले वजन मोजत असाल तर तुमच्याकडून काही चूक तर होत नाही ना? तुम्ही चुकीच्या वेळेत वजन मोजत असाल तर तुम्हाला तुमचे योग्य वजन समजू शकणार नाही.

लोक स्वतःच्या वजनाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. अशा वेळी तुमचे वजन कधी कमी होत आहे आणि केव्हा वाढत आहे याचे निरीक्षणतुम्ही केले पाहिजे. वजनाचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असतो आणि निरोगी राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. वजन मोजण्यासाठी लोक सामान्यतः मशीन वापरतात.
तुम्हीही तुमचे वजन आतापर्यंत अनेक वेळा मोजले असेल. मात्र जर तुम्ही दिवसभरात योग्य वेळी तुमचे वजन केले तरच तुम्हाला योग्य वजनाचा आकडा मिळेल. त्यामुळे वजन मोजण्याच्या योग्य वेळेकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी याची काळजी घ्यावी.
आपले वजन दिवसातून अनेक वेळा चढ-उतारातून जात असते. तुमचे वजन ट्रॅक करण्यासाठी, दुपारी किंवा संध्याकाळी स्वतःचे वजन करणे टाळा. असे केल्याने, तुम्हाला योग्य वजन कळू शकणार नाही आणि तुमचे निरीक्षण योग्यरित्या केले जाणार नाही. म्हणून तुमचे केलेले वजन हे योग्य नसेल.
एका अहवालानुसार, रिकाम्या पोटी वजन मोजण्यासाठी पहाटे ही सर्वोत्तम आणि अचूक वेळ आहे. तुमच्या शरीराचे योग्य वजन सकाळी कळते, कारण त्यावेळी पोट रिकामे असते आणि अन्नाचे वजन नसते. यामुळेच सकाळची वेळ ही सर्वोत्तम आहे.
जर हे शक्य नसेल तर व्यक्तीने दररोज त्याच वेळी स्वतःचे वजन केले पाहिजे. तुम्ही हे दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, पण त्याच वेळी वजन केल्याने तुम्हाला योग्य कल्पना येऊ शकते. मात्र, जेवल्यानंतर वजन करण्याऐवजी रिकाम्या पोटी वजन मोजावे. जेवण केल्यानंतर केलेले वजन हे तुम्हाला अधिक दिसून येईल.
महत्वाचे म्हणजे वजन मोजताना 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिले म्हणजे वजनाचे यंत्र म्हणजेच वजनकाटा उत्तम दर्जाचा असावा. तसेच वजन करताना तोच ड्रेस आणि शूज परिधान करावेत. यामुळे, वजनात बदल होण्याची शक्यता खूप कमी असेल. असे केले तर तुमचे योग्य वजन तुम्हाला नक्की समजेल.