सावधान ! या चुका करत असाल तर तुमचे बँक अकाउंट होईल सेकंदात साफ…

Sushant Kulkarni
Published:

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येतात.क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात.आजकाल क्यूआर कोड वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित असले तरी काही चुकांमुळे ते धोकादायक ठरू शकते.बनावट क्यूआर कोड ठेवून स्कॅमर्स लाखोंना चुना लावत आहे.

अलीकडे अशा काही घटना समोर आल्या आहेत.एका क्षणात तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते.त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

काही क्यूआर कोड्स तुम्हाला अज्ञात वेबसाइट्सवर रिडायरेक्ट करू शकतात.क्यूआर कोड स्कॅन करताना तुमचे ब्राऊझर किंवा फोन अज्ञात लिंकवर नेल्यास अत्यंत सावधगिरी बाळगा.गुगल लेन्स सारख्या साधनांचा वापर करून तुम्ही अज्ञात लिंक तपासू शकतात.

सार्वजनिक वायफाय वापरताना अलर्ट राहा

सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर क्यूआर कोड स्कॅन करत असताना तुमची माहिती चोरीला जाऊ शकते.त्यामुळे अशा नेटवर्कवर पेमेंट न करण्याचा विचार करा.

विनापडताळणी पेमेंट टाळा

क्यूआर कोड स्कॅन केल्यावर पेमेंट करण्यापूर्वी किमान दुसऱ्यांदा त्या कोडची पडताळणी करा.हे तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.पेमेंट करताना, क्यूआर कोड स्कॅन करतानाच पिन टाकल्यावर त्यात संपूर्ण माहिती तपासा. तुम्हाला काही शंका असेल तर अजिबात पेमेंट करू नका. संबंधितांकडून आधी खात्री करून घ्या.

नाव पडताळून पाहा

क्यूआर कोड स्कॅन करताना, त्यावर दिसणारे दुकान किंवा व्यक्तीचे नाव पडताळून पाहावे.कधी कधी बनावट क्यूआर कोड्स त्या स्थानावर किंवा व्यक्तीच्या नावावरून पेमेंट घेण्यासाठी तयार केले जातात.दुकान किंवा व्यक्तीचे नाव जुळत नसेल तर अजिबात पेमेंट करू नका.

..तर क्यूआर स्कॅन करू नका

डिजिटल पेमेंट करताना क्यूआर कोड आपल्याला ओळखीचा नसेल, तर तो अजिबात स्कॅन करू नका.सार्वजनिक ठिकाणी किंवा अनोळखी व्यक्तींकडून दिलेल्या क्यूआर कोड्सवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.अशा कोड्सद्वारे फसवणूक केली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe