रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांनो सावधान, संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!

रात्री उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं ही सवय तुमच्या शरीराचं नैसर्गिक चक्र बिघडवते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया जलद करते, असा निष्कर्ष समोर आला आहे.

Published on -

Late Risers Age Faster | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं ही एक सामान्य सवय बनली आहे. अनेकांना वाटतं की रात्री जास्त वेळ जागं राहून काम करणं किंवा मनोरंजनात वेळ घालवणं हाच जीवनशैलीचा भाग आहे. मात्र हीच सवय तुमचं आरोग्य हळूहळू खराब करू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या वाढत्या वयावर होतो. एका नव्या संशोधनातून हे समोर आलं आहे की उशिरा उठणाऱ्यांमध्ये वृद्धत्व लवकर येण्याची शक्यता अधिक असते.

वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे की, आपल्या शरीरामध्ये सर्केडियन रिदम नावाचं नैसर्गिक चक्र असतं, जे झोप, उठणं, हार्मोनल बदल, पचन, मानसिक स्थिती अशा अनेक गोष्टींवर परिणाम करतं. उशिरा उठणं या चक्राला बाधित करतं आणि त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. सर्केडियन रिदम बिघडल्याने शरीरात पेशींचं पुनरुत्पादन मंदावते, झोपेची गुणवत्ता कमी होते आणि मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. हे सगळं वृद्धत्व लवकर आणण्यास कारणीभूत ठरू शकतं.

संशोधनात हेही स्पष्ट झालं आहे की उशिरा उठणाऱ्यांमध्ये इनफ्लेमेशन म्हणजेच अंतर्गत जळजळ अधिक प्रमाणात दिसून आली आहे, ज्यामुळे शरीराच्या पेशी जलद गतीने खराब होतात. शिवाय उशिरा उठल्यामुळे शारीरिक हालचालींसाठी वेळ कमी मिळतो, यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि इतर जीवनशैलीजन्य आजारांचा धोका वाढतो.

उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम-

उशिरा झोपण्याचे काही दुष्परिणाम म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, थकवा, नैराश्य, स्मरणशक्ती कमजोर होणं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं. त्यामुळे शरीर अधिक थकलेलं, असमर्थ वाटतं आणि दिवसाची ऊर्जा कमी राहते.

लवकर उठण्याचे फायदे

दुसरीकडे, लवकर उठण्याचे फायदे पाहता ते आरोग्यदृष्ट्या अधिक सकारात्मक ठरतात. दिवसभर उत्साही वाटतं, तणाव कमी होतो, हार्मोनल संतुलन राखलं जातं, त्वचा अधिक निरोगी दिसते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते.

तज्ज्ञांच्या मते, शरीराचं नैसर्गिक चक्र सूर्याच्या प्रकाशानुसार चालतं. सूर्य उगवतो तेव्हा कॉर्टिसोल हा जागृतीसाठी जबाबदार हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. जर आपण या वेळी जागे नसलो, तर हे हार्मोनल संतुलन बिघडतं आणि दीर्घकालीन दुष्परिणाम देऊ शकतं.

यामुळेच तुम्ही जर उशिरा उठण्याची सवय लावून घेतली असेल, तर ती त्वरित बदलण्याची गरज आहे. कारण ही एक सवय तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर इतकी खोलवर परिणाम करू शकते की ती तुम्हाला वेळेआधीच म्हातारं करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe