BGMI ने Permanent Ban केले तब्बल 87,961 अकाउंट्स, तुमचे नाही ना अकाउंट बंद ?

Ahmednagarlive24
Published:

BGMI Account Banned ; भारतात PUBG च्या जागी आलेला बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया म्हणजेच BGMI देखील भारतात खूप लोकप्रिय ठरत आहे. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्ते या गेमचा आनंद घेत आहेत.

पण काही हॅकर्स सतत मोबाईल गेमिंगची मजा लुबाडण्याचा प्रयत्न करत असतात. कार्फटॉन कम्पनीला खेळाची विश्वासार्हता जपायची आहे

आणि यासाठी कंपनीने २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान ८७,९६१ खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. (BGMI Permanently Banned 87,961 Accounts)

माहिती देताना, BGMI ने म्हटले आहे की मोबाईल गेम यूजर सतत हॅकिंग, फसवणूक आणि इतर बेकायदेशीर कामांची तक्रार करत असतात आणि कंपनी सर्व प्रकारच्या समस्या गंभीरपणे घेत आहे.

यासाठी, गेमच्या डेव्हलपर्सने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फक्त ७ दिवसात एकूण ८७,९६१ खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे.

या बंदीनंतर ही खाती कधीही बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया खेळू शकणार नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की बीजीएमआय टीम नेहमी अशा प्रकरणांवर लक्ष ठेवते.

प्रत्येक महिन्याला लाखो वापरकर्त्यांवर बंदी घालण्यात येते

कार्फटॉनने आपल्या वापरकर्त्यांची बीजीएमआय गेमवर बंदी घालण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान कंपनीने ५९,२४७ खात्यांवर कायमची बंदी घातली होती.

या खात्यांवर फसवणूक आणि हॅकिंगसह त्या सर्व कृत्यांचा संशय होता जे गेमच्या नियमांविरूद्ध त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करत होते. त्याचप्रमाणे, बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाने २० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान १ ,९५,४२३ खात्यांवर बंदी घातली.

BGMI च्या टीम त्यांच्या गेम खेळाबद्दल सर्व प्रकारची काळजी घेऊ इच्छित आहेत. गेम डेव्हलपर्सच्या मते, त्यांची टीम गेममध्ये हॅकिंग किंवा फसवणुकीसारखी कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहे.

या खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घालून, BGMI डेव्हलपर्सनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की त्यांना त्यांचे गेम प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवायचे आहेत. कंपनीने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली की गेम खेळताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe