Hisense Smart TV : भारी डील ! १३ हजारांत ४३ इंच व १८ हजारांत ५० इंची स्मार्टटीव्ही

Ahmednagarlive24 office
Published:
Hisense Smart TV

Hisense Smart TV : जर तुम्ही मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या अत्यंत स्वस्त ४३ इंच आणि ५० इंच स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज २०२३ सेल सुरू होण्याआधी कंपनीने काही डील थेट केल्या आहेत. या सेलमध्ये तुम्ही Hisense चे ४३ इंच आणि ५० इंच आकाराचे स्मार्ट टीव्ही कमीत कमी किंमतीत खरेदी करू शकता. चला याबद्दल जाणून घेऊयात –

ऑफरनंतर स्वस्त दरात मिळणार टीव्ही

४३ इंचाचा Hisense A6H UHD Smart Google TV 2022 Edition सध्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ४४,९९० रुपयांऐवजी १९,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर ५० इंचाचे मॉडेल ५४,९९० रुपयांऐवजी २४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

फ्लिपकार्टकडून दोन्ही मॉडेल्सवर ५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. याशिवाय अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्यात तुम्हाला १५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. दोन्ही ऑफर्सचा फायदा घेतल्यास ४३ इंच टीव्हीची किंमत १३,४९९ रुपये तर ५० इंच टीव्हीची किंमत १८,४९९ रुपये होईल. याशिवाय ५५ इंच आणि ७५ इंच टीव्ही मॉडेलवरही तुम्हाला ही डील मिळणार आहे.

हायसेन्स स्मार्ट टीव्हीमध्ये काय खास आहे?

हायसेन्सच्या ४३ इंच आणि ५० इंच टीव्ही मॉडेल्समध्ये अल्ट्रा 4K डिस्प्ले उपलब्ध आहे. जे Google TV च्या OS वर काम करते. यामध्ये तुम्हाला Dolby Atmos, Dolby Vision आणि HDR 10 चा सपोर्ट मिळेल. या टीव्हीमध्ये 24W चे दमदार साउंड आउटपुट आहे.

या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि YouTube सारख्या OTT ऍप्सचा देखील सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात दोन यूएसबी पोर्ट, दोन एचडीएमआय पोर्ट आणि हेडफोन जॅक यांसारख्या वैशिष्ट्यांसह मिराकास्ट आणि क्रोमकास्ट सपोर्ट देखील आहे. याशिवाय स्पोर्ट्स आणि गेम्स मोडचे फीचर्सही यात उपलब्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe