कपड्यांवरील काळे, तेलकट डाग झटक्यात निघतील!महागड्या डिटर्जंटचीही गरज नाही, ‘हा’ घरगुती उपाय कपड्यांना देईल नवी चमक!

Published on -

प्रत्येकाला कपडे धुणे म्हणजे एक कंटाळवाणे कामचे वाटते, विशेषतः जेव्हा कपडे घाणेरडे होतात आणि ते नव्यासारखे स्वच्छ कसे करायचे हा प्रश्न पडतो. अनेकदा महागडे डिटर्जंट वापरूनही कपड्यांवरील डाग, पिवळेपणा निघत नाही. आता यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय आपण या लेखात जाणून घेणार आहेत जे तुमचा वेळ, मेहनत आणि पैसे दोन्ही वाचवू शकतात.

तुम्हाला जर वाटत असेल की फक्त महागडे डिटर्जंट वापरल्यानेच कपडे चमकदार आणि स्वच्छ होतील, तर ती कल्पना काहीशी चुकीची आहे. बऱ्याच वेळा महागड्या डिटर्जंटनेही कपड्यांमधली खोलवरची घाण निघत नही. अशावेळी खाली दिलेला घरगुती उपाय नक्की करून बघा.

घरगुती उपाय-

तुम्ही कपडे धुण्याच्या पाण्यात थोडा पांढरा व्हिनेगर मिसळा, आणि मग त्या पाण्यात कपडे काही वेळ ठेवा. हे खरंच जादूसरखं काम करतं. पांढऱ्या व्हिनेगरमुळे कपड्यांवरील डाग नीट निघतात आणि ते मऊ व स्वच्छ होतात. काही मिनिटांतच कपड्यांमधली घाण दूर होते, आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुतल्यावर कपडे नव्यासारखी चमक देतात. शिवाय, व्हिनेगरचा वापर केल्यामुळे कपड्यांतील घाण वासही नष्ट होतो, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.

बेकिंग सोडा-

आणखी एक प्रभावी पर्याय म्हणजे बेकिंग सोडा. अनेक घरांमध्ये बेकिंग सोड्याचा उपयोग केवळ अन्नातच नाही तर स्वच्छतेसाठी देखील केला जातो. त्याचा वापर कपडे धुण्याच्या पाण्यात केल्यास कपड्यांवरील घाण आणि डाग नीट निघून जातात. बेकिंग सोडा स्वस्त आणि सोपा उपाय असून त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो.

तुमच्या कपड्यांची काळजी घेण्यासाठी महागडे डिटर्जंटवर अवलंबून राहण्याऐवजी हे घरगुती उपाय वापरून पाहा. यामुळे तुमच्या कपड्यांना स्वच्छता, मऊपणा आणि नवीसारखी चमक मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News