Blood Sugar : सध्याच्या धावपळीच्या आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. अनेकांना व्यायामाचा अभाव आणि जेवणाच्या चुकीच्या वेळेमुळे अनेक आजार होतात.
त्यापैकी काहींचे आजार उपचार करूनही कमी होत नाही. मधुमेह हा त्यापैकीच एक आजार आहे. परंतु तुम्ही हा आजार नियंत्रणात आणू शकता. त्यासाठी तुम्हाला कोठेही जाणायची गरज पडणार नाही. घरीबसल्या हा आजार नियंत्रणात येईल.
पारंपारिक औषधांमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुईच्या पानांचा वापर करतात. तर अलीकडेच त्याचा परिणाम मधुमेहावरही दिसून आला आहे. आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग मधुमेहावरील उपचारात करण्यात येतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की या वनस्पतीच्या पानांचा आणि फुलांचा क्लोरोफॉर्म अर्क इंसुलिन-प्रेरित प्रतिकार रोखतो.
जाणून घ्या इतर काही फायदे
रुईच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळतात. तसेच त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. संधिवात, श्वासनलिकांसंबंधी दमा यांसारख्या आजारांवर देखील उपचार करण्यासाठी वापरले जातात. त्याशिवाय या वनस्पतीच्या मुळाचा उपयोग कुष्ठरोग, इसब, व्रण, अतिसार, सिफिलीस, हत्तीरोग आणि डांग्या खोकल्याच्या उपचारांत करतात. तर मुळांच्या अर्कामध्ये पायरेटिक आणि वेदनाशामक गुणधर्म आढळतात.
असा करा पानांचा वापर
जर तुम्हाला रुईच्या पानांचा वापर करायचा असेल तर तुम्ही तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. कारण या झाडाचे वेगवेगळे भाग जसे की पाने, मुळे किंवा फुलांचा रस स्वतः घेऊ नये. तो आयुर्वेदाचार्यांकडूनच घेणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक भागाचा वेगळा प्रभाव असतो. त्यामुळे कोणता भाग मधुमेहासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. हे पावडर, चहा किंवा डेकोक्शनच्या स्वरूपात वापरले जाते.
वापरा ही पद्धत
या वनस्पतीची दोन पाने घेऊन विरुद्ध बाजूने पायाच्या तळव्यावर ठेवावी.
हे तुम्ही दिवसभर किंवा रात्रभर ठेवा. त्यानंतर तुमचे पाय स्वच्छ धुवा. ही प्रक्रिया कमीत कमी एक आठवडा करा.
काळजी
हे लक्षात ठेवा की या पानांचे दूध विषारी असते. त्यामुळे तुम्ही ते कच्चे सेवन करू नये आणि आपल्या डोळ्यांच्या संपर्कात येणे टाळावे.